8 जुलैला रेल्वे बजेट सादर होण्याची शक्यता

June 3, 2009 9:54 AM0 commentsViews: 1

3 जून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी 8 जुलै रोजी रेल्वे बजेट सादर करतील अशी शक्यता आहे. रेल्वेमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यासंबंधीचा रिपोर्ट तयार करण्यात आलाय. येत्या दोन- तीन दिवसांत हा रिपोर्ट ममता बॅनर्जी यांच्याकडे दिला जाईल. त्यानंतर रेल्वे बजेटची रुपरेखा तयार केली जाईल. सहाव्या वेतन आयोगामुळं रेल्वेमंत्रालयावर अंदाजे 14 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे. रेल्वेमधील अन्न आणि स्वच्छता हे दोन मुद्दे रेल्वे बजेटमध्ये अजेंड्यावर असणार आहेत. त्यात सुधारणा व्हाव्यात यासाठी रेल्वेमंत्री काही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोठ्या शहरांवरच्या सुरक्षा वाढवण्यावरही या बजेटमध्ये भर दिला जाणार आहे.

close