हरियाणामध्ये 73 टक्के विक्रमी मतदान

October 15, 2014 9:54 PM0 commentsViews:

930aprilvoting_pbangal15 ऑक्टोबर : महाराष्ट्रासह हरियाणामध्येही आज विधानसभेसाठी मतदान पार पडलं. हरियाणामध्ये विक्रमी 73 टक्के मतदान झालं. सिरसामध्ये सर्वाधिक 79.4 टक्के मतदान झालं तर फरीदाबादमध्ये सर्वात कमी म्हणजे 57.6 टक्के मतदान झालं.

हरियाणामध्येही 19 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. हिस्सारमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. मतदानावरून जाट आणि दलित यांच्यात संघर्ष उद्भवला. त्यामध्ये काही वाहने जाळण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close