लातूर सामूहिक कॉपी प्रकणाच्या चौकशीत केला अडथळा आणण्याचा प्रयत्न

June 3, 2009 3:15 PM0 commentsViews: 48

3 जून बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याच्या आरोपावरून लातूर परीक्षा मंडळाने 2 हजार 883 विद्यार्थ्यांची चौकशी चालवली आहे. लातूरमध्ये राजस्थान विद्यालयात ही चौकशी सुरू असताना नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथल्या शिवसैनिक आणि परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून याठिकाणी तोडफोड करून, कर्मचार्‍यांना मारहाण केली. यावेळी मारहाण करणार्‍यांनी कर्मचार्‍यांना त्यांचं चौकशीचं काम जबरदस्तीनं बंद पाडायला लावलं. परीक्षा केंदावर हजर असणार्‍या पर्यवेक्षकांवरही कारवाही करण्यात यावी यासाठी त्यांनी ही तोडफोड केली असल्याचं समजत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मुलांना मदत करणारे पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुखांचीसुद्धा चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असं लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एम.आर.कदम यांनी सांगितलं.

close