सत्यम कॉम्प्युटर्सच्या कर्मचा-यांचं टेक महिंद्रा करणार कॉस्ट कटिंग

June 3, 2009 3:23 PM0 commentsViews: 5

3 जून सत्यम कॉम्प्युटर्सवर टेक महिंद्राने ताबा मिळवल्यानंतर सत्यमच्या कर्मचार्‍यांची नोकरी जाण्याची धास्ती कमी झाली होती. मात्र टेक महिंद्राने सत्यमच्या अतिरिक्त कर्मचार्‍यांना काढून टाकण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांची चिंता पुन्हा वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही कर्मचार्‍यांना कामावरून कमी केल्याच्या नोटीसा गेल्या असून चौदा हजार कर्मचार्‍यांचा यात नंबर लागेल अशी शक्यता आहे. यात ट्रेनीज, एचआर आणि मार्केटिंग एक्झिक्युटीव्हजना काढण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयामध्ये सरकारी हस्तक्षेप होण्याचीही शक्यता कमी आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

close