इस्त्रोकडून 7 उपग्रहांच्या सीरिज पैकी तिसर्‍या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

October 16, 2014 10:01 AM1 commentViews:

proxy

16 ऑक्टोबर :  मंगळ मोहिमेनंतर इस्रोनं आणखी एक यशाचं शिखर गाठलं आहे. सात उपग्रहांची सीरिज असणार्‍या ‘इंडियन रीजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधल्या (ISNSS) तिसर्‍या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांनी श्रीहरिकोटातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमप्रमाणे प्रादेशिक नॅव्हिगेशन प्रणाली स्थापित करण्याच्या उद्देशानं सात उपग्रहांची ही सीरिज भारतानं आखली आहे. जर 7 उपग्रहांच्या सीरिजचं यशस्वी प्रक्षेपण झालं तर भारताची जीपीएस यंत्रणा अमेरिकेच्या जीपीएस यंत्रणेइतकीच सक्षम बनेल आणि त्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. गेले चार दिवस इस्रोचे जवळपास एक हजार शास्त्रज्ञ यावर काम करत होते, असं इस्रोच्या एका संचालकांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Satish Patil

    good one…

close