राज्यात मतदानाचा टक्क वाढला

October 16, 2014 11:27 AM0 commentsViews:

lok-sabha-polls-107-lakh-firsttime-voters-in-maharashtra_130414120110

15 ऑक्टोबर : राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (बुधवारी) झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 64 टक्क्याच्या आसपास मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत 59.50 टक्के एवढं मतदान झालं होतं. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60.32 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत मतदानात नक्किच वाढला आहे. राज्यात सगळ्यात जास्त (84 टक्के) मतदान कोल्हापूरमधल्या करवीर मतदारसंघात झालं आहे तर सगळ्यांत कमी मतदान उल्हासनगरमध्ये 36.32 टक्के झाल्याची नोंद आहे. काही तुरळक अपवाद वगळता संपूर्ण राज्यात मतदान शांततेत पार पडल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.

 • नंदुरबार- 67.54 टक्के
 • धुळे- 61.70 टक्के
 • जळगाव- 62.78 टक्के
 • नागपूर- 60.58 टक्के
 • भंडारा- 62.59 टक्के
 • अकोला- 56.36 टक्के
 • वाशीम – 61 टक्के
 • बुलडाणा- 64.53 टक्के
 • अमरावती- 67.26 टक्के
 • वर्धा- 65.35 टक्के
 • गोंदिया- 67.02 टक्के
 • गडचिरोली- 44.75 टक्के
 • चंद्रपूर- 57.80 टक्के
 • यवतमाळ- 62.14 टक्के
 • नांदेड- 65.69 टक्के
 • हिंगोली- 67.66 टक्के
 • परभणी- 67.5 टक्के
 • जालना- 61.4 टक्के
 • औरंगाबाद- 70.29 टक्के
 • नाशिक- 63.09 टक्के
 • ठाणे- 53.07 टक्के
 • मुंबई उपनगर- 53.33 टक्के
 • मुंबई शहर- 55.11 टक्के
 • रायगड- 68.28 टक्के
 • पुणे- 61.71 टक्के
 • अहमदनगर- 67.84 टक्के
 • बीड- 66 टक्के
 • लातूर-66.36 टक्के
 • उस्मानाबाद- 64.96 टक्के
 • सोलापूर- 66.09 टक्के
 • सातारा- 67.06 टक्के
 • रत्नागिरी- 61.01 टक्के
 • सिंधुदुर्ग- 63.66 टक्के
 • कोल्हापूर- 74.50 टक्के
 • सांगली- 71.57 टक्के

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close