‘श्रमेव जयते’ योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2014 1:43 PM0 commentsViews:

140921164627-modi-interview-01-story-top

16 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (गुरूवारी) ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय श्रमेव जयते’ या योजनेचा शुभारंभ केला आहे. देशातील मजुरांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा आणण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. दिल्लीतील विज्ञात भवनात हा सोहळा पार पडला. यावेळी ‘श्रम सुविधा पोर्टल’, ‘लेबर इन्स्पेक्शन स्कीम’ तसेच ‘पीएफसाठी परमनंट अकाऊंट नंबर’ची योजनाही सुरू करण्यात आली आहे.

आजपर्यंत आपण फक्त ‘सत्यमेव जयते’ ऐकत होतो, पण देशाच्या विकासासाठी ‘श्रमेव जयतेही’ तितकेच महत्वाचे आहे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. दुदैर्वाने देशात आज फक्त व्हाईट कॉलर लोकांचा आदर केला जातो. आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. समाजात श्रम करणार्‍यांचा गौरव करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  तरुणांना प्रशिक्षणाची संधी देणार तसचं कामगारांना सुविधा पुरवणार असल्याचंही मोदी म्हणाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close