हाफीज सईदच्या सुटकेवर भारताची पाकिस्तानवर तीव्र नाराजी

June 3, 2009 4:01 PM0 commentsViews: 1

3 जून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याची काल लाहोर कोर्टाने सुटका केली. भारताने याविषयी पाकिस्तानकडं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही, असं परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त शहीद मलिक यांना आज सुनावलं. दहशतवादाचा मुद्दा सुटल्याशिवाय भारत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असं सूत्रांकडून समजतंय. युपीएचं पाकिस्तानाविषयीच्या धोरणाचा भर आता दहशतवादाला विरोध करण्यावर असेल, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, सईद याच्या सुटकेवर पाकिस्तान कायदेशीर पर्यांयाचा विचार करत आहे. पण पाकिस्तानने लाहोर कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याविषयी अजून कोणतंच आश्वासन दिलं नाहीये.

close