बुलेटला बॅलेटने उत्तर !

October 16, 2014 3:35 PM0 commentsViews:

16 ऑक्टोबर :  गडचिरोलीमध्ये मतदान घेणं हे आव्हान असतं, मात्र कुठल्याही धमक्यांना न घाबरता, बाहेर पडून आदिवासी बांधवांनी आपला लोकशाहीवरचा विश्वास सिध्द केला. इथं बुलेटची नाही तर बॅलेटची सत्ता चालत, हे गडचिरोलीतल्या आदिवासींनी जगाला दाखवून दिलं आहे.

महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातली ही स्थिती, अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शांततेत मतदानप्रक्रिया पार पाडणं हे एक आव्हान असतं. राज्यातल्या इतर भागांपेक्षा या जिल्ह्यात मतदानाची तयारी ही खूप आधी सुरू होते. मतदानाच्या आधी किमान दोन दिवस बेस कॅम्पवर सर्व साहित्य गोळं केलं जातात. या कॅम्पवर पोहोचण्यासाठी कधी 5 ते 10 किलोमीटर पायी जावं लागतं तर कधी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागते आणि सतत सोबत असतं माओवाद्यांच्या हल्ल्याचं सावट. माओवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता प्रशासनही त्यासाठी खूप कष्ट घेतं. माओवाद्यांच्या गोळ्यांची भीती आणि वर्षानुवर्ष होत असलेली उपेक्षा याला न जुमानता, धमक्या धुडकावून लावत आदिवासींनी भरभरून मतदान करत आपला लोकशाहीवरचा विश्वास व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close