वादळानंतरच वादळ !

October 16, 2014 3:52 PM0 commentsViews:

16 ऑक्टोबर : ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या वादळाला 4 दिवस उलटून गेले पण इथली परिस्थिती जैसे थे आहे. विशाखापट्टणम आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

या मंगामरीपेटा गावामध्ये राहणार्‍या अम्माजी, त्यांचं विशाखापट्टणममधलं घर हुदहुद वादळामुळे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालंय. आता इथे वीजपुरवठा नाही..पाणीपुरवठा नाही…वादळानंतर अम्माजींसारखे लाखो लोक अशाच भीषण परिस्थितीत दिवस काढत आहेत.

या कोळी समाजाचं तर खूपच नुकसान झालं आहे. त्यांच्या बोटी, जाळी यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांच्या घरांचंही मोठं नुकसान झालंय. पण त्यांनी बोटी आणि जाळ्यांची दुरुस्ती करणं याला प्राधान्य दिलंय. जगण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन हवंच असं त्यांचं म्हणणं आहे.

आंध्र प्रदेशच्या वीजमंडळाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्यासमोरही मोठं आव्हान उभं ठाकलंय. वीजपुरवठा सुरळीत व्हायला आणखी बरेच दिवस जातील. राज्य सरकारचे जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता सरकारच्या मदतीसाठी काही स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे

हुदहुद चक्रीवादळापुर्वी चांगली तयारी केल्याने मृत्यूचं प्रमाण कमी झालं पण चक्रीवादळानंतरची मदत मात्र सामान्यांना योग्य प्रमाणात आणि योग्य वेगाने मिळताना दिसत नाहीये. अशाच संथ वेगाने मदतकार्य सुरू राहिलं तर या चक्रीवादळातल्या पीडिताचं आयुष्य सुरळीत व्हायला खूप काळ जाईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close