एमएमआरडीए आणि एचडीआयएलची घरकुल योजना बाजारात

June 3, 2009 4:08 PM0 commentsViews: 3

3 जून सगळीकडे लो कॉस्ट हाऊसिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यात आता एमएमआरडीए आणि एचडीआयएल म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांनीही एक पाऊल पुढे टाकलं आहे. एमएमआरडीए आणि एचडीआयएल यांच्या करारांतर्गत ही घरकुल योजना भाडेतत्त्वावर अंमलात येईल. ज्यांचं मुंबईत घर नाही, अशा लोकांसाठी विरार स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर ही योजना साकारणार आहे. यासाठी 43 हजार घरं बांधण्यात येणार आहेत. 1 लाख 33 हजार कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. इथे घरं घेणार्‍यांना 800 ते दीड हजार रुपये भाडं भरावं लागेल. 525 एकर जागेवर होणार्‍या या प्रकल्पात चौदा मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 10 हजार घरं बांधण्यात येतील. पहिला टप्पा मार्च 2011 पर्यंत पूर्ण केला जाईल, असं एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आलं आहे.

close