धुळ्यामध्ये 8 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

October 16, 2014 2:35 PM0 commentsViews:

rape-victims-16 ऑक्टोबर : धुळे जिल्ह्यात एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावात ही घटना घडलीय.

प्रेम नगर भागात राहणार्‍या आदिवासी कुटुंबातील या मुलीचे आईवडील मतदानासाठी बाहेर गेले होते. त्यावेळेस ही घटना घडली. मुलीला एकटे पाहून अज्ञात व्यक्तीने तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने पळवून नेऊन अत्याचार केला. तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला.

दरम्यान, पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.तिला धुळ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अज्ञात व्यक्ती विरोधात शिरपूर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर आरोपीला अटक करून न्याय देण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close