साबीरभाईंना अखेरचा निरोप

October 16, 2014 2:19 PM0 commentsViews:

sabir bhai16 ऑक्टोबर : राज्याचे माजी कामगार मंत्री आणि शिवसेनेचे निष्ठावंत नेते साबीर शेख यांना आज अखेरचा निरोप दिला गेला. त्यांचं काल कल्याणमध्ये निधन झालं.

प्रत्यक्षात राबणारा कामगार ते कामगार मंत्री असा साबीर शेख यांचा जीवनप्रवास होता. साबीरभाईंच शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रेम होतं.शिवचरित्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. 125 गड-किल्ल्यांचं त्यांनी पदभ्रमण केलं होतं.

साबीरभाईंना शिवभक्त ही पदवी ही बाबासाहेब पुरंदरेंनी 25 वर्षांपूर्वी प्रदान केली होती. आज त्यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेना नेते एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे, गणेश नाईकांसह अनेक शिवसैनिक हजर आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close