निकाल काहीही लागतील पण राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही – तावडे

October 16, 2014 6:50 PM1 commentViews:

vinod tawade on ncp16 ऑक्टोबर : निकाल जे लागतील ते लागतील राष्ट्रवादीसोबत जाण्याचा कोणताही मुद्दा नाही असं भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. तर कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही युती तोडली असा खुलासा एकनाथ खडसेंनी केला. मुंबईत आज भाजपची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष 19 तारखेच्या मतमोजणीकडे लागलंय. टुडेज चाणक्य एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. भाजपला 151 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर शिवसेनेच्या वाट्याला 71 जागा येऊ शकतात. काँग्रेसला 27 जागा तर राष्ट्रवादीला 28 जागा मिळू शकतात. मनसे आणि इतर पक्षांना 11 जागा मिळू शकतात. बहुमत मिळालं नसल्यास भाजप कुणाची मदत घेणार याबद्दलही चर्चा सुरू झालीय. सत्तास्थापनेसाठी भाजप पुन्हा एकदा शिवसेनेची मदत घेण्याची शक्यता आहे. किंवा भाजप राष्ट्रवादीशीही हातमिळवणी करू शकतो. पण काहीही झालं तरी राष्ट्रवादीची मदत घेणार नाही, असं भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. तसंच आम्ही सर्व आढावा घेतला आहे आम्हालाच संपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला. युती तोडण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसेंना जबाबदार धरलंय. त्यांच्या विधानाचा खुलासा करत खडसे म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते काम करत होते त्यांना असं वाटायला लागली की आपल्या संधी दिली जात नाही. सेनेच्या बाबतीतही तसंच होतं जिथे भाजपच्या जागा होत्या तिथे शिवसैनिकांना तसं वाटायचं म्हणून कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून युती तोडावी असं कार्यकर्त्यांचा आग्रह होता तोच निर्णय आम्ही घेतला असं त्यांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    – गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते काम करत होते त्यांना असं वाटायला लागली की आपल्या संधी दिली जात नाही. सेनेच्या बाबतीतही तसंच होतं जिथे भाजपच्या जागा होत्या तिथे शिवसैनिकांना तसं वाटायचं म्हणून कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून युती तोडावी असं कार्यकर्त्यांचा आग्रह होता तोच निर्णय आम्ही घेतला असं त्यांनी स्पष्ट केलं.

    नाथा भाऊ , काय डबल ढोलकी वाजवताय हो … आतापर्यंत गळा ओरडून सांगत होता युती शिवसेनेच्या हट्टामुळे तुटली आणी आता म्हणे कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर युती आम्ही तोडली मग आता पर्यंत मुग गिळून गप्प का होता !!

close