बनावट मोबाईल सीमकार्ड करून विकणा-यांना औरंगाबादमध्ये अटक

June 3, 2009 4:29 PM0 commentsViews: 6

3 जून बनावट मोबाईल सीमकार्ड तयार करुन विकणा-या दोघांना औरंगाबादच्या सिडको पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्रे देऊन जालन्याच्या अभय बन आणि प्रदीप गजानन राठोड या दोघांनी एक व्हीआयपी नंबर रिप्लेस करून घेतला. हा नंबर मूळ सिडको एन-4 राहणा-या संदीप राठोड यांच्या नावावर होता. हा नंबर तब्बल 1 लाख रुपयाला विकताना त्यांना अटक करण्यात आली. आरोपीजवळ असलेली 3 मोबाईल, सीमकार्ड, बँक पासबूक पोलिसांनी जप्त केली आहे. आणखी किती कार्डांचा वापर केला गेला आहे आणि तो कुठे केला आहे याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पीएसआय बोडके पाटील यांनी दिली.

close