बुलेटप्रुफ जॅकेट खरेदीत झाला मोठा भ्रष्टाचार – रामदास कदम

June 3, 2009 4:36 PM0 commentsViews: 59

3 जून बुलेटप्रुफ जॅकेट खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं रामदास कदम यांनी आज विधानसभेच्या अधिवेशानात म्हटलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी मुंबई हल्ल्याचा मुद्दा उचलून घरला. विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी आज ऑस्ट्रेलियन बुलेट प्रूफ जॅकेट विधानसभेत आणून दाखवलं. फक्त 30 हजार रुपयात हे जॅकेट आयात केलं गेलं. पण सरकारनं जी बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केलीत त्याची किंमत 80 हजार रुपये आहे. आणि तरीही ती कुचकामी आहेत, असं रामदास कदम यांचं म्हणणं होतं. मुंबई हल्ल्याच्या वेळी अशा कुचकामी जॅकेटमुळेच पोलीस अधिकार्‍यांना आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप होत आहे. त्यामुळेच कदम यांनी चांगल्या प्रतीचं जॅकेट सभागृहात आणलं. विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाही दिल्या. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृह दोनवेळा तहकूब करावं लागलं.

close