राजस्थानातल्या अवकाळी पावसाचा तडाख ताल अभयारण्याला : 70 पेक्षा जास्त काळवीटांचा मृत्यू

June 3, 2009 4:50 PM0 commentsViews: 2

3 जून राजस्थानातल्या ताल छप्पर अभयारण्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. ताल छप्पर अभयारण्यात 70 पेक्षा जास्त काळवीटं मृत्युमुखी पडलीय आहेत. या अभयारण्याला पावसाचा तडाखा बसल्याने काळवीटांबरोबरच आणखी काही प्राण्यांचाही जीव गेला असावा, अशी शक्यता वनरक्षक इंदरजीत यांनी व्यक्त केली आहे.अभयारण्यात तरंगणार्‍या काळवीटांच्या अशेषांमुळे इथे भयाण शांतता पसरलीय. विशेषतः लहान आणि वयस्कर काळवीट निसर्गाच्या तडाख्याला बळी पडलेत. या सामूहिक मृत्यूला वनविभागाचं अव्यवस्थापन कारणीभूत असल्याचं स्थानिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काळवीटांना दुर्मीळ प्राणी ठरवून त्यांना भारतीय वन प्राणी संरक्षण कायद्याखाली उच्च दर्जाचं संरक्षण देण्यात आलंय. दरम्यान, थार छप्पर अभयारणातल्या काळवीटांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती आहे.

close