छत्तीसगड सरकारचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर

June 3, 2009 5:00 PM0 commentsViews: 1

3 जून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या डॉ. बिनायक सेन यांची छत्तीसगड सरकारनं दोन वर्षांनंतर सुटका केली. पण छत्तीसगड सरकारचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये गांधीवादी कार्यकर्ते हिंमाशू कुमार गेल्या 17 वर्षांपासून आदिवासींसाठी वनवासी चेतना आश्रम चालवतात. या आश्रमावर 17 मे या दिवशी बुलडोझर फिरवण्यात आला. हा आश्रम विकासाची कामं करत नाही आणि तो बेकायदेशीर आहे म्हणून सरकारने हा कारवाईचा बडगा उगारलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी मिळून मॅगसेसे पुरस्कार विजेते संदीप पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समिती स्थापन केलीय. या समितीनं आपला अहवाल तयार केला आहे. वनवासी चेतना आश्रमाचे काही प्रकल्प हे सरकारी योजनांशी संबधित होते. तरीही छत्तीसगड सरकार हिंमाशू यांच्या कामाला विकासविरोधी शिक्का मारत आहे, ही विसंगती असल्याचं या समितीने म्हटलं आहे.

close