विदर्भात भाजपला आघाडी ?

October 16, 2014 10:26 PM0 commentsViews:

vidarbha_poll16 ऑक्टोबर : ‘वेगळा विदर्भ’ झाला पाहिजे अशी मागणी विदर्भवाद्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून लावून धरलीये. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही हाच मुद्दा कळीचा बनला. भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचं आश्वासन दिलं. तर शिवसेनेनं कडाडून विरोध केला. त्यामुळे विदर्भ कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला. विदर्भात एकूण 62 जागांसाठी मतदान झालंय त्यात भाजपने आघाडी घेतलीये. आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी अंदाज व्यक्त केलाय. यानुसार भाजपला 26 ते 28 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला 13 ते 15 जागा, शिवसेनेला 9 ते 10 आणि राष्ट्रवादीला 6 ते 7जागा मिळतील. अपक्षांना 2 ते 3 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर दैनिक लोकसत्ताचे नागपूरचे ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक 40 जागा मिळतील. तर इतर पक्षांना दुहेरी आकडाही पूर्ण करता येणार नाही असा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. आता उत्सुकता आहे ती निकालाची. बुधवारी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपच्या बाजून कौल देण्यात आलाय. पण विभागानुसार निकाल कसा असू शकतो याची चर्चा सुरू झालीये. विदर्भ नेहमी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न राहिला. या निवडणुकीत वेगळ्या विदर्भावरून चांगले रण गाजले. भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले तर शिवसेनेनं कडाडून विरोध केला. विदर्भात एकूण 62 जागांसाठी मतदान झालं. एक्झिट पोलमध्ये भाजपने बाजी मारलीये. विदर्भात ही हेच चित्र पाहण्यास मिळत आहे. विदर्भात भाजपने बाजी मारली आहे. आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी अंदाज व्यक्त केलाय. यानुसार भाजपला 26 ते 28 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला 13 ते 15 जागा, शिवसेनेला 9 ते 10 आणि राष्ट्रवादीला 6 ते 7जागा मिळतील. अपक्षांना 2 ते 3 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर दैनिक लोकसत्ताचे नागपूरचे ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक 40 जागा मिळतील. विशेष म्हणजे भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते रिंगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, मल्लिकार्जुन रेड्डी आणि आशिष देशमुख यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

- कौल विदर्भाचा

आशिष जाधव यांचा अंदाज

एकूण जागा – 62

भाजप – 26-28
काँग्रेस – 13-15
शिवसेना – 9-10
राष्ट्रवादी – 6-7
अपक्ष – 2-3

ब्युरो चीफ लोकसत्ता नागपूर देवेंद्र गावंडे यांचा अंदाज

भाजप – 40
काँग्रेस – 8
शिवसेना – 4
राष्ट्रवादी – 3
भारिप – 2
अपक्ष – 5
मनसे- 0
बसपा – 0

2009 चा निकाल

काँग्रेस – 24
भाजप – 19
शिवसेना – 8
राष्ट्रवादी – 4
भारिप – 1
अपक्ष – 6

बिग फाईटस्

1) नागपूर दक्षिण पश्चिम
- देवेंद्र फडणवीस ( भाजप )
- प्रफुल्ल गुडदे ( काँग्रेस )
- पंजू तोटवानी ( शिवसेना ) – भाजप बंडखोर

2) बल्लारपूर
- सुधीर मुनगंटीवार ( भाजप )
- घनश्याम मूलचंदानी ( काँग्रेस )
- वामनराव झाडे ( राष्ट्रवादी )

3) रामटेक
आशिष जैस्वाल- शिवसेना
सुबोध मोहिते- काँग्रेस
अमोल देशमुख- राष्ट्रवादी
मल्लिकार्जुन रेड्डी- भाजप

4) काटोल
अनिल देशमुख – राष्ट्रवादी
आशिष देशमुख – भाजप

5) गोंदिया
- गोपाळदास अग्रवाल ( काँग्रेस )
- विनोद अग्रवाल ( भाजप )
- अशोक गुप्ता ( राष्ट्रवादी )
- राजकुमार कुथे ( शिवसेना )
- योगेश बनसोड ( बसप )

6) तुमसर
- मधुकर कोकाडे ( राष्ट्रवादी )
़- प्रमोद तित्तिरमारे ( काँग्रेस )
- राजेंद्र पटले ( शिवसेना ) – बंडखोर भाजप
- चरण वाघमारे ( भाजप )

 

7) ब्रह्मपुरी

विजय वडेट्टीवार – काँग्रेस
संदीप गड्डमवार – राष्ट्रवादी
अतुल देशकर – भाजप

 8) बडनेरा
रवी राणा- राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष
सुलभा खोडके- काँग्रेस
संजय बंड- शिवसेना

 9) तिवसा
यशोमती ठाकूर- काँग्रेस
संयोगिता निंबाळकर- अपक्ष
दिनेश वानखेडे- शिवसेना

10) यवतमाळ
राहुल ठाकरे- काँग्रेस
मदन येरावार- भाजप
संदीप बाजोरिया- राष्ट्रवादी

 11) अचलपूर
- बच्चू कडू ( अपक्ष )
- सुरेखा ठाकरे ( शिवसेना )
- वसुधा देशमुख ( राष्ट्रवादी )
- अनिरुद्ध देशमुख ( काँग्रेस )
- अशोक बनसोड ( भाजप )

12) खामगाव
- दिलिप साणंदा ( काँग्रेस )
- आकाश फुंडकर ( भाजप )
- अशोक सोनावणे ( भारिप बहुजन महासंघ )
-हरिदास हुरसड ( शिवसेना )
- नाना कोकरे ( राष्ट्रवादी )

 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close