अण्णांच्या हत्येच्या कटाचं प्रकरण सीबीआयकडे सोपवावं – विखे-पाटील यांची मागणी

June 4, 2009 7:00 AM0 commentsViews: 13

4 जून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्याच्या प्रकरणाची स्वतंत्र सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केली आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकांत हा महत्त्वाचा मुद्दा राहील. तसंच निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल, असंही विखे-पाटील म्हणाले आहेत. नगरमधल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही मागणी केली आहे. त्यावेळी विखे पाटील यांनी राज्यात गुंडगीरी वाढत चालली असून याला वेळीच आळा घालण्याची गरजही व्यक्त केली. नंतर निवडणुका स्वतंत्र लढवाव्यात असा सूरही त्यांनी लावला.

close