ताईचा भावासाठी पुढाकार,…तर सेनेशी चर्चा करेल !

October 16, 2014 11:22 PM5 commentsViews:

pankaja on uddhav16 ऑक्टोबर : पंकजा मुंडे माझी बहिण असून बहिणीच्या विरोधात लढणार नाही अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि ती पूर्ण ही करून दाखवली. उद्या जर भाजपला बहुमताची गरज भासली तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेशी बोलण्याची तयारी दाखवली आहे. जर पक्षांनी मला आदेश दिले तर शिवसेनेशी चर्चा करेल असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय.

मतदान संपल्यानंतर सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपचा बोलबाला पाहण्यास मिळालाय. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरले असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. याबाबत आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींने पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली यावेळी त्या म्हणाल्या, आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि राज्याच्या सत्तेत भाजप येईल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदासाठी आपण काम केलं नाही. पण भाजपचा मुख्यमंत्री होण्यात आपला नक्कीच वाटा असेल असंही त्यांनी सांगितलं. सरकार बनविण्यासाठी गरज भासली आणि पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले तर आपण शिवसेनेशी बोलू असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार तोफ डागली. पण दुसरीकडे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे आमच्या घरचे सदस्य होते. पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या माझ्या बहिणी सारख्या आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव यांनी आपला शब्द पाळत बीडमध्ये मुंडे कुटुंबीयांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. पंकजा मुंडे यांनीही उद्धव यांच्या निर्णयाबद्दल जाहीर आभार मानले होते. मात्र आता निकालाची वेळ जवळ आलीये भाजपला जर बहुमतासाठी सेनेची गरज भासली तर पंकजा मुंडेंच ‘मातोश्री’वर दाखल होतील हे आता स्पष्ट झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Adv Nachiket

  Konala fasavtay raao….chhatrapati shivaji maharajanni kadhi afzal khanashi haat milavani keli hoti ka? Hindu hruday samratanchya pakshala jyanni satta laalsepoti lathadla tyanchyashich keval satta sthapanechya aamishapai punha maitri karanya itpat marathmoli asmita futkal nahiye Shivsainikanchi.

 • Sachin Malu

  Jar Pankaja Mundech Swataha Mukhyamantri Honar Aasel tarach Shivseneni Madat karavi anyatha Karu naye.

 • VINOD

  JAR BJP AANI SHIVSENA EKATRA AALI SATTE SATHI TAR TO CHATRAPATI SHIVAJI MAHARAJANCHA GHOR APMAAN KAREL SHIVSENA……………………..

 • VINOD

  ASE JHALE TAR SENELA JANTA MAAF KARNAAR NAHI…………………….PARAT YETILCH 5 VARSHA NANTAR VOTE MAGAYALA ! PAN MAJHYA SARKHYA SHIV SAINIKALA VISHWAS AAHE UDDHAV SAHEB ASE KARNAAR NAHIT…….

 • niteen

  Jar bjp shivsenechya madtine maharashtracha vikas krnar asel tar thik ahe ani h..maharastrache tukde nko
  Sampurn maharastra maza maharashtra

close