एक्झिट पोलवर आपला विश्वास नाही – छगन भुजबळ

October 17, 2014 9:09 AM0 commentsViews:

Chagan Bhujbal

17 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलने भाजप आघाडी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. यावर आयबीएन लोकमतशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपला एक्झिट पोलवर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पोस्ट पोल सर्व्हेमध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल, असा निष्कर्ष काढण्यात आला असला तरी या एक्झिट पोलवर आपला विश्वास नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, निवडणूक ही प्रक्रिया सरकार बनवण्यासाठीच असते त्यामुळे राज्याच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असेल असं मतही त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. तसचं या निवडणुकीत राष्ट्रवादीला 65 जागा मिळतील, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close