‘स्वच्छ भारत अभियाना’ची मोनिका मोरे ब्रँड अॅम्बॅसेडर

October 17, 2014 10:01 AM0 commentsViews:

Monica mOre
17 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात केली. मी कचरा करणार नाही आणि कोणाला कचरा करूनही देणार नाही अशी शपथ यावेळी नरेंद्र मोदींनी भारतातील जनतेला दिली आणि मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी राजभवन येथे स्वच्छ भारत अभियानाचं आवाहन स्विकारत, सर्वांच्या सक्रिय सहभागातून महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि सुंदर बनवूया, असं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून, अभिषेक बच्चन, अंजली भागवत, आप्पासाहेब धर्माधिकारी, नीता अंबानी, मकरंद अनासपुरे, सचिन तेंडुलकर, सुनिधी चौहान या मान्यवरांसोबतच महाराष्ट्राची धैर्यकन्या मोनिका मोरेचीही ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे.

आतापर्यंत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, टेनिसस्टार सानिया मिर्झा यांसारखे सेलिब्रिटी ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी झाले आहेत. सचिनने पहाटे चार वाजता स्वत: झाडू हाती घेऊन साफसफाई केली तर अंबानींनीही चर्चगेट स्टेशन झाडून अभियानात सहभागी झालेत.

दरम्यान, मोनिका मोरेने नरेंद्र मोदींचे आभार मानले असून भारताच्या प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close