जयललितांना अखेर जामीन मंजूर

October 17, 2014 1:46 PM0 commentsViews:

amma banner

17 ऑक्टोबर : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना आज (शुक्रवारी) अखेर सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जयललितांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्या 20 दिवसानंतर कारागृहातून बाहेर येणार आहेत.

जयललिता यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आजच दिवाळी साजरी करण्यास सुरवात केली आहे. जयललिता यांचे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करत आहेत.

बेहिशोबी मालत्तेप्रकरणी जयललिता यांना न्यायालयाने 4 वर्षांची कारावास आणि 100 कोटी रुपयांची शिक्षा सुनावली होती. जयललिता यांनी कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर जयललितांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रिम कोर्टाने जयललितांना दिलासा देत खटला खूप वेळ चालत असल्याचं सांगत काळजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, 27 सप्टेंबर रोजी जयललितांना बंगळुरूमधल्या जेलमध्ये रवाना करण्यात आल्यानंतर तामिळनाडूमध्ये हिंसक घटनाही घडल्य आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close