सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यसरकार सतर्क :समुद्रात उभारणार बारा सागरी ठाणी

June 4, 2009 7:10 AM0 commentsViews: 89

4 जून 26/11 च्या हल्ल्यानंतर राज्याची सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यसरकार सतर्क झालंय. त्यासाठी बारा सागरी पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. तशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी काल विधानसभेत दिली. राज्याच्या सागरी किनार्‍यापासून 12 नॉटिकल अंतर सुरक्षित ठेवण्यासाठी ही पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. तर त्यापुढच्या अंतराच्या सुरक्षिततेची जबाबदारी तटरक्षक दल आणि नौदलाकडे सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या पूर्व किनार्‍यावर 5 पोलीस नौका गस्तीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच आतापर्यंत जवळपास 57 टक्के मच्छिमारांना ओळखपत्रं देण्यात आली आहेत, असंही जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितलं.

close