अपेक्षित उमेदवाराला मत न दिल्यानं महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

October 17, 2014 1:52 PM1 commentViews:

Image img_132882_nashik567_240x180.jpg17 ऑक्टोबर :   वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून वृद्ध महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकजवळ येवला येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

यवला तालुक्यातल्या बाभुळ गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. झेलूबाई वाबळे असं या पीडित महिलेचं नाव आहे. मतदानाच्या दिवशी तिसरं बटन दाबलं नाही म्हणून आपल्याला जाळण्यात आल्याची जबानी या महिलेनं पहिल्यांदा पोलिसांकडे दिली होती. तिच्या जबानीनुसार पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटकही केली. मात्र, नंतर आपली जबानी फिरवली आणि पदर पेटल्यानं आपण भाजल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे.

नाशिकच्या सीव्हील हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येवला पोलिसांनी संशयित तिघांना अटक केलं आहे. दरम्यान, येवला तालुक्यातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांनी मात्र या घटनेची आपल्याला काही कल्पना नसल्याचं आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं आहे. 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shailesh

    tisara button senecha hota ka?

close