टी-20 वर्ल्ड कपच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये भारताचा पाकवर विजय

June 4, 2009 7:46 AM0 commentsViews: 9

4 जून टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. मॅचवर भारताची सुरुवातीपासून चांगली पकड होती. भारताच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला रोहित शर्मा आणि गौतम गंभीरने. विरेन्द्र सेहवागच्याऐवजी ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने पाक बॉलर्सची पुरती दाणादाण उडवली. त्याने 53 बॉलमध्ये 80 रन्स काढल्या. भारताने 17 ओव्हर्समध्ये अवघ्या एका विकेटच्या बदल्यात पाकिस्तानच्या 158 रन्सचा पाठलाग केला. गौतम गंभीरनेही रोहित शर्माला चांगली साथ दिली. त्याने 47 बॉल्समध्ये 53 रन्स काढल्या. याआधी, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये भारताला पराभव पत्कराला लागला होता. पण, पाकिस्तानविरुद्धच्या या विजयाने भारताने ते अपयश धुऊन काढलं. या विजयामुळे भारताचा टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठीचा आत्मविश्वास उंचावला आहे.

close