चव्हाणांनी भान ठेवायला पाहिजे होतं -राणे

October 17, 2014 8:44 PM1 commentViews:

123rane_on_cm17 ऑक्टोबर : पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा प्रकारचं भाष्य ऑफ द रेकॉर्ड किंवा ऑन द रेकॉर्ड असं बोलायला नको पाहिजे होतं. मुख्यमंत्री असतो त्यांनी पक्ष टिकवायचा असतो. पक्ष टिकला तर आपले पद कायम राहते पक्ष संपवून त्यांचं पद कायम राहणार नव्हते त्यांनी याबद्दल भान ठेवायला हवे होते अशा शब्दात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेतला.

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे जे तीन नेते आहे. त्यांच्याबद्दल चव्हाण बोलले. मी ही उद्योगमंत्री होतो तेव्हा मला आदर्शची सगळी एबीसीडी माहिती होती पण मी कधी त्याबद्दल बोललो नाही. चव्हाणांनी याबद्दल भान ठेवायला पाहिजे होतं असा सल्लावजा टोलाही राणेंनी लगावला. भाजप जे बोलते ते कधी करत नाही. उद्या जर त्यांना बहुमताची गरज भासली तर राष्ट्रवादी किंवा मनसेसोबतही जाऊ शकते. कारण त्यांना सत्ता हवी आहे पण भाजपक डे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीये. प्रशासन सांभाळू शकेल असा कोणताही नेता त्यांच्याकडे नाही अशी टीकाही राणेंनी केली. शिवसेना काहीही सुधारली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना अधोगतीला लागली आहे. युती तुटल्यामुळे सेना कमजोर झाली आहे अशी टीकाही राणेंनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SANJAY CHAVAN

    its so mannerless work from naroba

close