फैसला दिग्गजांचा : मराठवाड्यात बाजी कोण मारणार ?

October 19, 2014 7:08 AM0 commentsViews:

marthavada19 ऑक्टोबर : मराठवाडा म्हटलं तर महाराष्ट्राचं ह्रदय…पण याच मराठवाड्याला कधी मागासलेला म्हणून हिणवलं गेलं तर कधी याच मराठवाड्याने दुष्काळाचे चटके सहन केले. हे इथंच थांबत नाही बळीराजाच्या आत्महत्येमुळेही मराठवाडा नेहमी बातमीत राहिला आणि आहे. परंतु औद्योगिक, कृषी, सामाजिक, पर्यटन आणि राजकारणाच्या बाबतीत मराठवाडा नेहमी अग्रेसर राहिला. राजकारणाच्या बाबतीत विचार केला तर याच मराठवाड्यातून महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री मिळाले. अनेक केंद्रीय आणि राज्यमंत्रिपद मराठवाड्याच्या भूमिपुत्रांनी निभावली.   सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पण मराठवाड्यात कोण जिंकणार कोण ? कोण हरणार ?

(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )

 

2009 साली कुणाला किती जागा मिळाल्यात ?

एकूण जागा – 46

काँग्रेस – 18
राष्ट्रवादी – 12
शिवसेना – 7
भाजप – 2
मनसे – 1
अपक्ष – 6

 

प्रतिष्ठापणाला – दिग्गजांचा काय आहे निकाल ?

औरंगाबाद पूर्व-

 • राजेंद्र दर्डा, काँग्रेस – पराभूत (21203)
 • अतुल सावे, भाजप – विजयी (64528)
 • डॉ.भालचंद्र कांगो, सीपीआय – पराभूत (1592)
 • सुमित खांबेकर, मनसे – पराभूत (1419)

औरंगाबाद मध्य

 • प्रदीप जैस्वाल, शिवसेना – पराभूत (41861)
 • किशनचंद तनवाणी, भाजप – पराभूत (40770)
 • इम्तियाज जलिल, एमआयएम - विजयी (61843)
 • एम.एम.शेख, काँग्रेस – पराभूत (9093)

औरंगाबाद पश्चिम

 • संजय शिरसाट, शिवसेना - विजयी (61282)
 • जितेंद्र देहाडे, काँग्रेस - पराभूत (14798)
 • गंगाधर गाडे, एमआयएम - पराभूत (35348)
 • मधुकर सावंत, भाजप – पराभूत (54355)

फुलंब्री

 • डॉ.कल्याण काळ, काँग्रेस - पराभूत (69683)
 • हरिभाऊ बागडे, भाजप – विजयी (73294)

सिल्लोड

 • अब्दूल सत्तार, काँग्रेस – विजयी (96038)
 • सुनिल मिरकर, शिवसेना – पराभूत (50909)

6) परळी

 • पंकजा मुंडे, भाजप - विजयी (96904)
 • धनंजय मुंडे, राष्ट्रवादी – पराभूत (71009)

7) लोहा

 • प्रताप चिखलीकर, शिवसेना – विजयी (92435)
 • मुक्तेश्वर धोंडगे, भाजप – पराभूत (46949)
 • शंकर धोंडगे पाटील, राष्ट्रवादी – पराभूत (29294)

8) भोकर

अमिता चव्हाण, काँग्रेस – विजयी (100781)
डॉ.माधवराव किन्हाळकर-भाजप – पराभूत (53224)

5) लातूर (शहर)

अमित देशमुख, काँग्रेस -विजयी (119656)
शैलेश लाहोटी, भाजप – पराभूत (70191)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close