‘पुणे तेथे नेतेही काय उणे’

October 17, 2014 11:01 PM0 commentsViews:

17 ऑक्टोबर : निवडणूक म्हटली की, उमेदवार एकमेकांवर सडकून टीका करतात,आरोप-प्रत्यारोपही चालतात. पण आता मतदान झालंय. पुण्यातले काही नेते वाडेश्वर कट्‌ट्यावर जमले, आणि खाद्यपदार्थांवर ताव मारत कोण बाजी मारणार यावर चर्चा केली. पुण्यातील वाडेश्वर कट्‌ट्यावर शहरातील सर्वपक्षीय राजकीय पुढार्‍यांच्या पुण्यातील तसंच राज्यातील विधानसभा लढतीत काय होणार याची चर्चा रंगली. एरवी एकमेकांच्या राजकीय उखाळ्या पाखाळ्या काढणारे पुणेरी पुणेकर खाद्यपदार्थ्यांवर ताव मारत कोण बाजी मारणार यावर गरमागरम चर्चा करत होते. काँग्रेसचे संजय बालगुडे आणि सतीश देसाई,राष्ट्रवादीचे अंकुश काकडे भाजपचे अनिल शिरोळे, शिवसेनेचे शाम देशपांडे,मनसेचे बाळा सेडगे आणि आर.पी.आयचे महेंद्र कांबले यांच्याशी कटट्‌यावर केलेली चर्चा..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close