‘बेळगाव’ आता ‘बेळगावी’ होणार

October 18, 2014 9:27 AM0 commentsViews:

Belgavi

18 ऑक्टोबर : बेळगावसह कर्नाटकातील एकूण बारा गावांच्या नामांतरास केंद्र सरकारने शुक्रवारी परवानगी दिली आहे. ‘बेळगाव’चे ‘बेळगावी’ करण्यास केंद्र सरकारने परवानगी देऊन पुन्हा एकदा मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे . केंद्र सरकारने ‘बेळगाव’चं नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कर्नाटक सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर आठ वर्षांनी केंद्र सरकारने कर्नाटकमधील 12 शहरांच्या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बेळगावचे नामकरण बेळगावी झाले आहे. 1 नोव्हेंबरपासून बेळगावसह 12 शहरांची नावं बदलण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबर रोजीच कर्नाटकचा राज्येत्सव दिवसही साजरा केला जोतो. कर्नाटकमधील 12 शहरांचे नामकरण कन्नड भाषेतील उच्चारांप्रमाणे असावे, असा प्रस्ताव कर्नाटक सरकारने 2006 मध्ये दिला होता त्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान, यासाठी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणेने नामकरणाला ना-हरकत दर्शविल्यानंतर ही मंजुरी दिली गेली आहे. बेळगाव शहरासह बंगलोर,गुलबर्गा, हुबळी शहरांची नाव बदलण्यात येणार आहेत.


1 नोव्हेंबरपासून बदलणार नावं

 • बेळगाव- बेळगावी
 • बेंगलोर- बंगळुरु
 • मंगलोर- मंगळुरु
 • बेल्लारी- बल्लारी
 • बिजापूर- विजापुरा
 • चिकमंगळुर- चिकमंगळुरु
 • गुलबर्गा- कलबुर्गी
 • म्हैसूर- म्हैसुरे
 • होस्पेट- होस्पेटी
 • शिमोगा- शिमोग्गा
 • हुबळी- हुब्बाळ्ळी
 • तुमकुर- तुमकुरु

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close