पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

October 18, 2014 9:55 AM0 commentsViews:

pakistan violates ceasefire again-83889

18 ऑक्टोबर :पाकिस्तानी सैन्याकडून काल (शुक्रवारी) रात्री पुन्हा एकदा पूँछ जिल्ह्यातील एलओसीवरच्या भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांत हमीरपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून तिसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. हमीरपूर सेक्टर शुक्रवारी रात्री त्यांच्याकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर गोळीबार सुरू होता.

पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून भारतीय चौक्यांवर आणि सीमेवरील गावांवर गोळीबार सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 62 जण जखमी झाले आहेत. सीमेवरील गावांतील सुमारे 30 हजार नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close