राज्याचं शेवटचं बजेट सादर : निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांची खैरात

June 4, 2009 1:42 PM0 commentsViews: 3

4 जून अर्थंमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्याचा 2009-10 चा अर्थसंकल्प सादर केला. सध्याच्या आघाडी सरकारचा हा शेवटचाच अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन आहे. हे लक्षात घेऊन सरकारनं अनेक आकर्षक योजना या अर्थसंकल्पात जाहीर केल्यात. एकप्रकारे सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांचा गवगवा या अर्थसंकल्पाचा निमित्ताने केला. राज्यातल्या सर्व कार्यरत प्रकल्पांसाठी पाच हजार सातशे पंच्चावन कोटी रुपये दिले जाणार आहेत. ही घोषणा अर्थमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी अर्थसंकल्पत के ली. रस्ते, रेल्वे अशा नागरी सुविधांच्या या विकासकामासाठी 37 हजार 915 कोटी रुपयांची तरतूद करण्याची माहीती त्यांनी दिली. दाभोळ वीजप्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यसरकारने सातशे कोटींची हमी दिली आहे. या प्रकल्पातून सध्या 940 मेगावॅट वीज मिळतेय पण हा प्रकल्प पूर्ण झाला तर राज्यात अधिकवीज मिळू शकेल असे दिलीप वळसेपाटील यांनी सांगितलं. रेल्वे सुधारणेकडे विशेष लक्ष दिलं जाणार असून पुणे नाशिक रेल्वेचे काम जलद गतीनं हाती घेण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.परळी 2 आणि पारस हे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने 463 कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध केलं आहेत. या प्रकल्पांमधून सप्टेंबर 2009 मध्ये पाचशे मेगावॅट वीज निर्मिती होइल. अशी माहिती दिलीप वळसेपाटील यांनी दिली. तसंच शेतकरी आणि यंत्रमाग धारकांना देण्यात येणार्‍या सवलती यावर्षी कायम असण्याची घोषणा त्यांनी केली. 68 तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामुळे तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायला येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या सरपंचासाठी आनंदाची बातमी आहे. सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात आलीय. तसंच सरकारी बैठकीनिमित्त मिळणार्‍या भत्त्यांमध्येही दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात अनेक ठिकाणी योजना राबवल्या जातायत. त्यासाठीच्या कार्यक्रम रुपरेषेची माहिती यावेळी वळसे पाटील यांनी दिली. घराच्या शोधात असलेल्या मुंबईकरांनाही या बजेटनं दिलासा दिला आहे. एमएमआरडीए पाच लाख घर बांधणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

close