काँग्रेस -राष्ट्रवादीला मतदान केलं म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी

October 18, 2014 6:02 PM0 commentsViews:

hingoli3418 ऑक्टोबर : हिंगोलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान केल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघंजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कळमनुरी इथल्या जुन्या बसस्थानक भागात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान का केलं याचा जाब विचारत दोन गटांत बाचाबाची झाली. वाद वाढल्याने बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाली. या मारहाणीत तिघं जखमी झाले आहेत. कळमनुरी इथं प्राथमिक उपचार करून जखमींना पुढच्या उपचारासाठी दोघांना नांदेड इथं हलवण्यात आलंय. तर एकाला हिंगोली येथील शाशकीय रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी फरजाना बेगम ताजुद्दिन सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून अय्याजखान पठाण, वसीम पठाण, जहांगीरखान पठाण, मुमताजखान पठाण, सादेकखान पठाण, मुन्नाखान पठाण, वाहेद पठाण, इम्रानखान पठाण, अजमद पठाण (सर्व रा. कळमनुरी), रहेमतखान पठाण (रा. पुसद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी आरेफनीसाबेगम यांच्या तक्रारीवरून समशेरखान पठाण, लुकमान सिद्दीकी, फारुख ऊर्फ पप्पू समशेरखान पठाण, अफरोजखान पठाण, सारिया ताजोद्दीन सिद्दीकी, पाशाखान मकदूमखान, अर्शनखान सिद्दीकी यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close