नीता अंबानी ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी

October 18, 2014 5:35 PM0 commentsViews:

18 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानात रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी याही आता सहभागी झाल्या आहेत. आज मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर यांच्यासह राज्याच्या ब्रॅन्ड ऍम्बेसेडर नीता अंबानी यांनी मुंबईच्या जेजे हॉस्पिटल व त्याच्या आजुबाजूच्या परिसराच्या सफाईला हातभार लावत या अभियानात सहभागी झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ तात्याराव लहाने, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे आणि आरोग्य सचिव मनिषा म्हैसकर या ही उपस्थित होत्या. याचबरोबर भायखळा मार्केट परिसराचीही आज स्वच्छता करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात केली होती. मी स्वत: कचरा करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही, अशी शपथ घेऊन लोकांनाही याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, टेनिसस्टार सानिया मिर्झा, अभिषेक बच्चन, मकरंद अनासपुरे, सुनिधी चौहान यांसारखे सेलिब्रिटीही ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close