चेंबूरच्या स्वामी विवेकानंद कॉलेजचा हर्षद चव्हाण मुंबईत प्रथम

June 4, 2009 3:04 PM0 commentsViews: 5

4 जून बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वत्र मुलांनी बाजी मारली असताना, मुंबई विभागात मात्र चेंबूरच्या स्वामी विवेकानंद कॉलेजच्या हर्षद चव्हाण 96.67 टक्के मिळवून या विद्यार्थ्याने सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. हर्षद चव्हाणने कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नव्हता. ' 94 टक्के मिळतील अशी माझी अपेक्षा होती. पण त्या पेक्षा जास्त मिळालेले मार्क हे मी माझं नशीब समजतो, ' अशी प्रतिक्रिया हर्षदने दिली. हर्षद दिवसांतून जास्तीत जास्त चार तास अभ्यास करायचा. मात्र अभ्यासाचं त्याने कधीही टेन्शन घेतलं नाही. संगणकाशी संबधीत क्षेत्रात हर्षद चव्हाणला करिअर करायचं आहे.

close