अकोले आणि गुहागरचा निकाल सर्वात आधी ?

October 19, 2014 5:59 AM0 commentsViews:

counting3419 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सगळ्या मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतोय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी पाच उमेदवार असल्याने तिथले निकाल सर्वात आधी लागण्याची अपेक्षा आहे.

नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक 39 उमेदवार असल्याने तिथले निकाल उशिरानं लागण्याची शक्यता आहे. पहिल्या तासाभरात निकालांचे कल येतील आणि दुपारपर्यंत बहुतांश निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. मालेगाव हा सर्वात छोटा मतदारसंघ असून तिथे केवळ 218 तर मुंबईतील वडाळा मतदारसंघात 222 मतदान केंद्र असल्याने हे निकालही लवकर लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी आपापले काऊंटिंग एजंट नेमण्याच काम केलंय. प्रत्येत मतमोजणीच्यावेळी हे काऊंटिंग एजंट हजर असणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close