दीडशे नव्या कॉलेजेसना सरकार देणार परवानगी – उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे

June 5, 2009 5:35 AM0 commentsViews: 8

5 जून येत्या काही दिवसात आर्टस्, कॉमर्स आणि सायन्सच्या नवीन दीडशे कॉलेजेसना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे 25 हजार नवीन सीट्स उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. उच्चशिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या या खुशखबरीमुळे निकालानंतर लागलीच ऍडमिशनमध्ये व्यस्त असणा-या कित्येक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा आम्ही दीडशे नवी कॉलेजेस देणार आहोत. एक कॉलेज हे 120 संख्येचं असणार आहे. तर आम्ही जवळजवळ पंधरा हजारांच्यावर विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसंच बरीचशी कॉलेज नवीन तुकड्या मागतात. तर अशा नवीन तुकड्या काढल्या तर जवळजवळ 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. आणि नवीन व्यावसायिक कॉलेजसमध्ये आम्ही ऍडिशनल तुकड्यांची सोय करणार आहोत. 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांची क्षमता वाढेल, अशी सोय आम्ही पारंपरिक आणि व्यावसायिक कॉलेजेसमध्ये करत आहोत, अशी माहिती देताना उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे म्हणाले. एक नजर टाकूया आता उपलब्ध असलेल्या जागांवर-बारावीनंतरच्या ऍडमिशन्स्मध्ये 4 मुख्य कॅटेगिरी इंजिनिअरिंगसाठी 71 हजार जागा आहेत.मेडिकलसाठी तीन हजार 745 जागा आहेत.फार्मसीसाठी सात हजार 675 जागा आहेत.डिप्लोमा फार्मसीसाठी 11 हजार 830 जागा आहेत.आर्कीटेक्टसाठी दोन हजार 30 जागा आहेत.डीएडसाठी 72 हजार जागा उपलब्ध आहेत.बीएडसाठी 40 हजार जागा आहेत.बीए, बीकॉम, बीएस्सी या डिग्रीसाठी साडेसहा लाख जागा उपलब्ध आहेत.

close