काँग्रेसला धक्का, नारायण राणे पराभूत

October 19, 2014 12:07 PM1 commentViews:

narayan Rane19 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीची चित्र जवळपास स्पष्ट झालंय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात काही धक्कादायक निकाल आले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. कुडाळमध्ये शिवसेनेचं नेते वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा 10 हजार 203 मतांनी पराभव केलाय. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी काँग्रेसचे प्रचारप्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रचाराला सामोरं गेली मात्र त्यांच्या पराभवाची धक्कादायक बातमी आली आहे. प्रचारात राणे विरुद्ध शिवसेना आणि राणे विरुद्ध मोदी असा सामना रंगला होता. तर लोकसभेतही राणे यांनी आपला मुलगा निलेश राणे यांच्यासाठी जंग जंग पछाडले होते पण तरीही निलेश राणे यांचा पराभव झाला. निलेश राणे यांनी विधानसभेसाठीही अपक्ष म्हणून लढण्यासाठी बंड पुकारले होते. पण राणे यांच्या सांगण्यावरून निलेश यांना माघार घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे नितेश राणे ही कणकवलीतून निवडणूक लढवत आहे. नितेश राणे निकालात आघाडीवर आहे तर त्यांचे वडील मात्र पराभूत झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    निवडणुकीत जय-पराजय हे व्हायचेच. तुम्ही विजय साजरे केले तसे आता पराभवही पचवा… आता जनताजनार्दनास दोष न देता, बोला मायबाप जनहो, जो निकाल तुम्ही दिलाय तो मला मान्य आहे, आणी कामाला लागावे !!

close