‘बाबां’नी गड राखला, कराडमध्ये पृथ्वी’राज’

October 19, 2014 2:04 PM0 commentsViews:

8cm prithviraj chavan19 ऑक्टोबर : ‘क्लिन मिनिस्टर’ अशी प्रतिमा लाभलेले काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला गड कायम राखला आहे. आपल्या होम टाऊन दक्षिण कराडमध्ये प्रतिष्ठेची ठरलेली लढत चव्हाण यांनी जिंकली आहे.

तब्बल सातवेळा विधानसभेवर निवडून आलेल्या विलासकाका उंडाळकर यांचा चव्हाण यांनी 15, 596 मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेल्याने उंडाळकर यांनी चव्हाण यांना आव्हान देत निवडणूक लढवली होती.

त्यात काँग्रेसच्याचं नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधत निकालापुर्वीच पराभवाचं खापर त्यांच्या माथी फोडण्याची तयारी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत चव्हणांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण अखेरीस चव्हाणांनी सुटकेचा श्वास सोडलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++