इंग्लंडमधल्या टी-20 वर्ल्डकपच्या धूमला सुरुवात

June 5, 2009 6:03 AM0 commentsViews:

5 जून इंग्लंडमध्ये आजपासून टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला इंग्लंड-हॉलंडच्या सलामी मॅचने सुरुवात होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये बारा टीम सहभागी झाल्या आहेत. चार ग्रुपमध्ये प्रत्येकी तीन टीमचा समावेश करण्यात आलेला असून. ग्रुप 'ए'मध्ये भारतीय टीमची लढत असेल ती बांगलादेश आणि आयर्लंडशी. 6 जूनपासून भारताच्या मिशन वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी भारत ग्रुप 'ए'मधली आपली पहिली मॅच बांगलादेशविरुध्द खेळणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारताच्या सगळ्या मॅचेस ह्या भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता सुरू होणार आहे.

close