मी स्वत:हून बोलणार नाही, उद्धव ठाकरेंचा पवित्रा

October 19, 2014 8:02 PM6 commentsViews:

udhav mahalkxmi sabbha3319 ऑक्टोबर : मला कुणी एकटं पाडू शकत नाही. त्यांना जर राष्ट्रवादीने प्रस्ताव दिला आहे तर त्यांनी सोबत जावं पण मला अजून असा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे मी पुढे होऊन बोलणार नाही. मी माझ्या घरी आहे असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलीये. निकालानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर समाधान व्यक्त केलं आणि विजय शिवसैनिकांना अर्पण केला. मात्र शिवसेनेकडून भाजपला फोन करण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरली सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे निकालही अपेक्षेप्रमाणेच लागला. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भाजपने आजपर्यंत सर्वाधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. भाजप आणि घटकपक्षांनी 122 जागा जिंकल्यात. पण बहुमताचा 145 जागांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आपला पत्ता टाकत भाजपला कोणतीही अट न टाकता पाठिंबा दिला. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

कोण कुणाकडे जात आहे ते मला माहिती नाही. पण अखंड महाराष्ट्राचा विकास करणार्‍याला आमचा पाठिंबा राहिल. पण मला अजून तरी कुणी विचारलं नाही. कुणाचा निरोप आला नाही. त्यामुळे मी स्वत:हून भाजपशी बोलणार नाही. मलाही तसा कुणाचा निरोप आला नाही त्यामुळे मी जरी त्यांच्याकडे प्रस्ताव दिला तर त्यांनी नाकारला तर काय करणार ? अगोदरच राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे त्यांना मान्य असेल तर भाजपने जावं. पण मी स्वत:हून चर्चा करणार नाही मी माझ्या घरीच आहे. जोपर्यंत कुणी येत नाही तोपर्यंत मी समोर जाणार नाही असा पवित्रा उद्धव यांनी घेतलाय. आमच्यासमोर अजूनही पर्याय खुले आहे असंही ते सांगण्यास विसरले नाही. आम्ही एकाकी लढलो जो काही विजय मिळाला आहे तो शिवसैनिकांमुळे मिळाला आहे. शिवसैनिकांचे आभार हीच माझी ताकद आहे. आम्ही दादर जिंकलंय. आणि शिवसेनाप्रमुखांना त्रास देणार्‍यांना धडा शिकवला असं सांगत त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • anil suryawanshi

  ses.uddtha agle C.M.

 • Sham Dhumal

  जनमत कोणाच्या बाजुने आहे हे जनतेने आता दाखवून दिले आहे. तरीही शिवसेनेचा आडमुठेपणा तसाच आहे.
  आता पुन्हा युती करण्याची संधी जर का शिवसेनेने ठोकरली तर मात्र शिवसेनेला फरच हानीकारक होईल.

 • Sham Dhumal

  युती तोडुन शिवसेनेने आपल्याच पायावर दगड मारल्याचे आता ऊघड झाले आहे.

 • Sham Dhumal

  शिवसेनेकडुन अनेकदा भाजप ला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे.
  संजय राऊत नेहमीच शिवसेनेला आणि भाजपला अडचणीत आणण्याचे काम करत असतात.

  • mrk

   Central Government madhe Modi PM Zale yacha saglyana anand zala pan nantarchya BJP chya Rajkarna mule tyani Haryana ani Maharashtrachi Yuti Todlli.

   BJP Che yash he swabalavar milalele nahi. Ani Modi Lat hi kahi ayushyabhar purnar nahi. BJP chi shakti maharashtrat fakta Vidarbha madhe jast aahe baki yash he kshanbhangur aahe. (fakta 5 Varsha)
   (Modi effect – addl. Seats (20) all over Maharashtra )

   Aata partyanchya history pramane BJP chya vadhlelya jaga

   BJP che sarkar aalyavar Vidarbha cha CM banel ani Vidarbha Vegle rajya hoil tya mule Vidarbha madhlya congress chya paramparik matdarani Congress kade hya election la path firavli (Addl Seat Gained – 20)

   Pach Varsha nantar BJP la evdhe aamdar ektya cha balavar nivdun anayache ashakya aahe karan Jya Congress ani NCP chya balekilyat BJP la yash milale aahe tyacha itihas sangto ki pudhcya nivadnukit congress ani NPC punha tya jaga parat milavlelya aahet. (Addl. Seat Gained 15)

   BJP la hya election madhe jya baki party ne support kela hota tyachya balavar evdhe yash milale aahe pan baki party madhil fakta 1 aamdar nivdun aala pudhcya nivadnukit hya party jar sarkar madhe vata milala nahi tar BJP chi sath sodun jatil. (Adddl seat gained 8)

   Marathwada regioin madhe / Beed madhe Swargiya Gopinath Munde yanchi sahanbhutichi Lat hoti tya mule thoda fayda zala. (Addl. set gained 5)

   Aayat kelelya aamdarnpaiki fakta 22 aamdar jinkun aale baki 38 harle.
   Hya 22 madhe pudhya election chya veli 10 aamdar tari parat party sodun janare aahet (Tyacha itihas asech sangto) (Addl. Seat gained 10)

   Shivsena Ekti ladhunahi 44 varun 63 var pochli. Yacha artha Shivsena ajunahi Majbut aahe. Shivseneche Paramparik madtar firle nahit. BJP che matdar he fakta hya eleciton purte vadhlele matdar aahet.

   BJP Chi Maharashtratli Khari Shakti – 45 Seats.

   123 Less 78 (20-20-15-8-5-10) Additional seats gained.

   Yeh bhi din jayenge. Ajun 5 Varsha nantar BJP la tyanchi khari Maharashtra madhil shakti kiti aahe te kalel.
   Ani jar Velga Vidarbha, Belgav che nam karan, Mumbai ani Maharashtra madhle mahatvachi Govt offices, Govt authorities la jar janun bujun Maharashtra chya bahe nenyacha prayatna kela gela tar 45 cha aagada 25 var pan yeu shakto.

   JAI MAHARASHTRA.

 • Sham Dhumal

  झाकली मूठ लाखाची होती आता शिवसेना आणि भाजपचा जनाधार काय आहे आणि फरक किती आहे ते उघड झाले आहे.

close