अर्धे आयाराम पास निम्मे नापास !

October 19, 2014 9:12 PM0 commentsViews:

ram kadam and gavit19 ऑक्टोबर : गेल्या 25 वर्षांचा शिवसेना आणि भाजपचा संसार मोडल्यानंतर प्रत्येक पक्षाला स्वबळावर लढाव लागलं. कोणत्याही पक्षांची स्वबळावर लढायची तयारी म्हणावी तशी झालेली नव्हती. अशातच भाजपने आयत्यावेळी आयात केलेले उमेवार या निवडणुकीच्या परिक्षेत अर्धेच उमेदवार पास झालेले दिसत आहे.

भाजपमध्ये एकूण 56 उमेदवार राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधून डेरे दाखल झाली होती. राष्ट्रवादीचे नेते माजी वैद्यकीय मंत्री विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, सुर्यकांता पाटील या दिग्गज नेत्यांसह मनसेचे नेते राम कदम भाजपमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे तिन्ही नेते मोदी लाटेवर स्वार होतं विजयी ही झाले.

एकूण 56 उमेदवारांपैकी 22 उमेदवार विजयी झाले तर 34 उमेदवार पराभूत झाले. एवढेच नाहीतर शिवसेनेशी युती तोडून भाजपमध्ये दाखल झालेले रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिव संग्राम संघटना यांना भोपळाही फोडता आला नाही हे विशेष. फक्त महादेव जानकर यांच्या समाज पक्षाचा एक उमेदवार निवडून आला.

—————————————————————-
भाजपचे एकूण आयात उमेदवार – 56
विजयी उमेदवार- 22
पराभूत उमेदवार -34
—————————————————————
1) नंदुरबार – विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी) – विजयी
2) धुळे- अनिल गोटे (लोकसंग्राम पक्ष) – विजयी
3) भुसावळ – संजय सावकारे (राष्ट्रवादी) विजयी
4) अमरावती – सुनील देशमुख (काँग्रेस) – विजयी
5) हिंगणा- समीर मेघे (काँग्रेस) -विजयी
6) भोकर – माधवराव किन्हाळकर (काँग्रेस) – पराभूत
7) परभणी – आनंद भरोसे (काँग्रेस) – पराभूत
8) औरंगाबाद मध्य – किशनचंद तनवाणी (शिवसेना) – पराभूत
9) गंगापूर – प्रशांत बंब (अपक्ष) – विजयी
10) सिन्नर – माणिकराव कोकाटे (काँग्रेस-राणे समर्थक) – पराभूत
11) मुरबाड – किसनराव कथोरे (राष्ट्रवादी) – विजयी
12) बेलापूर – मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी) – विजयी
13) घाटकोपर (प.) – राम कदम (मनसे) – विधिमंडळ आवारात पोलिसाला मारहाण – विजयी
14) पनवेल – प्रशांत ठाकूर- (काँग्रेस)- राहुल गांधींचे विश्वासू ! – विजयी
15) चिंचवड – लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी) – विजयी
16) श्रीगोंदा – बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी) -नाथाभाऊंनी विधानसभेत तुफान टीका केलेले – पराभूत
17) शिराळा- शिवाजीराव नाईक (काँग्रेस) – विजयी
18) तासगाव – अजित घोरपडे (काँग्रेस) – पराभूत
19) पुरंदर – संगीता राजे निंबाळकर (मनसे) पराभूत
20) नांदेड दक्षिण – दिलीप कंदकुर्ते -पराभूत
21) बुलढाणा- योगेंद्र गोडे (राष्ट्रवादी) – पराभूत
22) दौंड -राहुल कुल -रासप (राष्ट्रवादी) – विजयी
23) सावंतवाडी – राजन तेली (काँग्रेस) – पराभूत
24) उस्मानाबाद- संजय दुधगावकर (काँग्रेस) – पराभूत
25) लातूर- शैलेश लाहोटी (काँग्रेस) – विजयी
26) कन्नड – संजय गव्हाणे (समता परिषद) – पराभूत
27) पारनेर-बाबासाहेब तांबे (शिवसेना) – पराभूत
28) राहुरी-शिवाजी कर्डिले (राष्ट्रवादी) -विजयी
29) राहाता -राजेंद्र पिपाडा (राष्ट्रवादी) – पराभूत
30) नेवासा-बाळासाहेब मुरकुटे (काँग्रेस) – विजयी
31) आष्टी – भीमराव धोंडे (राष्ट्रवादी) -विजयी
32) शेवगाव- मोनिका राजळे (राष्ट्रवादी) विजयी
33) चोपडा – जगदीश वळवी (राष्ट्रवादी) – पराभूत
34) धुळे ग्रामीण – मनोहर बडने (काँग्रेस) – पराभूत
35) नांदगाव- अद्वय हिरे (राष्ट्रवादी) – पराभूत
36) जालना- अरविंद चव्हाण (राष्ट्रवादी) – पराभूत
37) बीड- विनायक मेटे (शिवसंग्रामचे उमेदवार) -पराभूत
38) पैठण – विनायक हिवाळे (शिवसेना) – पराभूत
39) श्रीरामपूर – भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस) – पराभूत
40) कोपरगाव- स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी) – विजयी
41) घनसावंगी – विलासराव खरात (काँग्रेस) – पराभूत
42) कोल्हापूर (द.)- अमल महाडिक (काँग्रेस) -विजयी
43) अहमदनगर – अभय आगरकर (भाजप, नंतर राष्ट्रवादी) – पराभूत
44) निफाड- भगवान बोरस्ते (शिवसेना) – पराभूत
45) भोर- शरद ढमाले (शिवसेना) – पराभूत
46) जुन्नर – नेताजी डोके (शिवसेना) – पराभूत
47) आंबेगाव – जयसिंह एरंडे (शिवसेना) – पराभूत
48) जिंतूर – संजय साडेगावकर (शिवसेना) – पराभूत
49) खेड आळंदी – शरद बुट्टे (राष्ट्रवादी) – पराभूत
50) ऐरोली – वैभव नाईक (शिवसेना) – पराभूत
51) भिवंडी (ग्रा) – शांताराम पाटील (राष्ट्रवादी) – पराभूत
52) भिवंडी (पू) – संतोष शेट्टी (राष्ट्रवादी) – विजयी
53) बारामती- बाळासाहेब गावडे (राष्ट्रवादी) – पराभूत
54) चंद्रपूर- संजय देवतळे (काँग्रेस) – पराभूत
55) वर्धा – डॉ. पंकज भोयर (काँग्रेस)- विजयी
56) कराड (द) – अतुल भोसले (काँग्रेस) – पराभूत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close