पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला धोबीपछाड

October 20, 2014 10:13 AM2 commentsViews:

kemcom1602_7
20 ऑक्टोबर :  पुणे शहरातील सर्व जागा जिंकून भाजपने राष्ट्रवादीचे साम्राज्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे.

पुणे जिल्ह्यात भाजपने इतिहास घडवत शहरातील सर्व 8 जागा मोठ्या मताधिक्क्याने खिशात तर घातल्याच, शिवाय जिल्ह्यात मित्रपक्षासह (रासप) दोन अधिकच्या जागा खेचताना एकूण 21 पैकी 12 जागा जिंकल्या आहेत तर अहमदनगर जिल्ह्यात भाजपने पहिले स्थान तर काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 3 जागा मिळवून दुसरे स्थान राखले. शिवसेनेला केवळ एकच जागा मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 4 जागा मिळवत राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. काँग्रेसने गेल्यावेळेपेक्षा 1 जागा जास्त मिळवली असून भाजपचे 2 आमदार इथून निवडून आले आहेत.

निवडणुकीआधी स्वबळाची भाषा करणार्‍या अजित पवारांची मुख्यमंत्रिपदाची मनीषा होती, पण निकालानंतर घोर निराशा झाली आहे. राष्ट्रवादीच्या अपयशाचं सर्वात पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीची प्रतिमा. गेली अनेक वर्षं राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावरून, राष्ट्रवादीचे मंत्री अकार्यक्षम आणि मुजोर आहेत, असा एक दाट समज जनतेत झाला आहे. पुणे परिसरात जे उमेदवार हरले, त्यातले बहुतांश उमेदवार हे अजित पवारांचे समर्थक आहेत, हे विशेष. शहरी भागात दणदणीत अपयश आल्यामुळे पक्षाच्या शहरी कार्यकर्त्यांचं जबर खच्चीकरण झालं आहे.

दुसरं म्हणजे राष्ट्रवादीचं संघटन हे म्हणावं तसं वाढलंच नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. फक्त प्रमुख नेत्यांभोवती कार्यकर्त्यांचं जाळं मोठं होत गेलं. धनंजय मुंडे आणि दिलीप सोपल यांच्यासारख्या नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना पुरेसा जनाधार नव्हता. त्यामुळे उमेदवाराला फक्त आर्थिक पाठबळ पुरवलं, की तो जिंकतोच, हा गैरसमज या निवडणुकीत दूर झाला. काँग्रेससारखाच राष्ट्रवादीचा प्रचारही विस्कळीत होता असं कारणही राष्ट्रवादीला अजिबात देता येणार नाही, कारण गेली 15 वर्षं ते काँग्रेससोबत सत्तेत होते. राष्ट्रवादी हा ग्रामीण पक्ष मानला जायचा. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातला आणि त्याहूनही मराठ्यांचा पक्ष, यावर आता जनतेचा ठाम विश्वास बसत चाललाय. दुसरीकडे, राष्ट्रवादीत शरद पवारांशिवाय राज्याच्या राजकारणात पानही हलत नाही, असं म्हणतात. पण आज न मागता राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला. याला पवारांची राजकीय शोकांतिकाच म्हणायला हवी.

 +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • positive

    Dadoji konddev effect punyat janawla.. Sarv ummedwar BJP che ale.. Ata sarv rajkarnyana ek goshta lakshat thevle pahije… Saglya jati dharmana samavun ghetlyashivay satta milnar nahi… Ani vikas karne must asel…

    • amol

      अरे माठ्या, रेटून खोटे बोलू नको, दादू कोनदेव ह्यचा पुतळा उखडल्या नंतर लगेचच महापालिकेतील निवडणुका झाल्या…राष्ट्रवादी सर्वात जास्त जागा जिकून महापालिकेच्या सत्तेत आली…जर परिणाम होयचा झाल्यास लगेचच होयला हवा होता आता इतक्या वर्षांनी त्याचा काय परिणाम…जर भाजप ने तो पुतळा परत ठेवायचा प्रयत्न केल्यास पुढच्यावेळेस ८ हि जागा गमवाव्या लागतील अगदी बापटाची सुद्धा…मत हे विकास करण्यासाठी दिले आहे असले भटी राजकारण करण्यासाठी नाही

close