दिल्लीत लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला अटक

June 5, 2009 7:53 AM0 commentsViews: 2

5 जून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुतुबमीनारजवळ एका लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला अटक केली आहे. दिल्लीच्या मेहरोली विभागात अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचं नाव मोहम्मद उमेर मदनी असं सांगण्यात आलं आहे. आपण नेपाळी नागरिक असल्याचा दावा मदनीने पोलिसांसमोर केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 वर्षांचा मदनी लष्कर-ए -तोयबाच्या नेपाळ विभागाचा प्रमुख आहे. तसंच तो मुंबई हल्ल्यांशी संबंधीत जमात-उद-दावाचा प्रमुख हफिज सईद याचाही विश्‍वासू सहकारी आहे. दिल्ली पोलिसांनी नेपाळी नागरिकत्व असल्याचं एक ओळखपत्र मदनीकडून जप्त केलं आहे. पोलिसांनी मदनीकडून मोठ्या प्रणाणात खोट्या आणि खर्‍या भारतीय नोटाही जप्त केल्यात. मदनी भारत नेपाळ सीमा ओलांडून भारतात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

close