ठाण्यात भाजपची ‘एंट्री’

October 20, 2014 4:09 PM0 commentsViews:

20 ऑक्टोबर :  शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठाण्यात यावेळेस आपला गड राखण्यात यश मिळालं असलं तरी भाजपनं या बालेकिल्ल्यात शिरकाव केलाय. ओवळा माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक आणि कोपरी- पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झालेत. पण एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या असलेल्या ठाणे शहराची जागा मात्र भाजपनं शिवसेनेकडून हिरावून घेतलीये. भाजपच्या संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा पराभव करत ही जागा जिंकलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close