दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस अहमदवर कराचीत हल्ला

June 5, 2009 8:38 AM0 commentsViews: 4

5 जूनदाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमवर कराचीत हल्ला झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. कराचीतील हबीब बँकेसमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्यावर 12 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बलुची गँगने त्याच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या हल्ल्यात दाऊद इब्राहीमही जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी दाऊदचा छोटा भाऊ नूरा याची हत्या झाली होती. त्यानंतर दाऊदच्या भावावर पुन्हा हल्ला झाला आहे. पाकिस्तानने दाऊद कराचीत नाही अशीच भूमिका वारंवार घेतली आहे. त्यामुळे पाक मीडियानेही या घटनेची वाच्यता केलेली नाही.

close