सेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा होता प्रस्ताव-पवार

October 20, 2014 5:08 PM0 commentsViews:

sharad_pawar_on_sena20 ऑक्टोबर : सरकार स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा द्यावा असा काँग्रेसचा प्रस्ताव होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. पण असं कडबोळं सरकार टिकणार नाही, असं स्पष्टीकरणही शरद पवार केलं. तसंच सरकार बनवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार नाही असं शरद पवार यांनी जाहीर केलं. मूलभूत विचारधारेशी आम्ही तडजोड करणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने सर्वाधिक 123 जागा जिंकल्यात पण बहुमतासाठी 145 जागा गाठता आल्या नाहीत. भाजप कुणाचा पाठिंबा घेणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने भाजपला विनाअट बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी हिताचा निर्णय घेतला असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. मात्र भाजपने ‘आस्ते कदम’ घेत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीने नवी खेळी खेळली. सरकार बनवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार नाही असं शरद पवार यांनी जाहीर केलं. मूलभूत विचारधारेशी आम्ही तडजोड करणार नाही, असंही ते म्हणाले. पण त्यांनी एक आणखी एक नवा गौप्यस्फोट केला. सरकार स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा द्यावा असा काँग्रेसचा प्रस्ताव होता असं शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीने अगोदरच विनाअट पाठिंबा जाहीर केला. तर आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते असा इशारा भाजपला दिलाय. जर काँग्रेस 42, राष्ट्रवादी 41 आणि शिवसेनेच्या 63 जागांचं गणित पाहिलं तर बहुमताचा आकडा सहज पार केला जातो. पण पवारांनी ही शक्यता व्यक्त करत असं कडबोळं सरकार टिकणार नाही असं स्पष्टीकरणही केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close