आमदार साहेब, 25 व्या वर्षी मिळवली आमदारकी !

October 20, 2014 6:46 PM0 commentsViews:

sanjay jagtap420 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. अनेक दिग्गजांना जनतेनं घरचा रस्ता दाखवला. पण यंदाच्या निवडणुकीत सर्वात तरुण उमेदवार असलेले श्रीगोंद्याचे काँग्रेसचे आमदार राहुल जगताप जायंट किलर ठरले आहेत.

श्रीगोंदा मतदार संघातील गेल्या 35 वर्षांची भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुतेंची सत्ता राहुल जगताप या अवघ्या 25 वर्षांच्या तरुणानं उलथून टाकलीय. सर्व पक्ष फिरून आलेल्या बबनरावांनी यावेळी मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी भाजपचं कमळ हाती घेतलं.

मात्र, पाचपुतेंच्या विरोधातल्या सर्व पक्षांनी राहुल जगताप यांना साथ दिल्यानं ते पाचपुतेंचा पराभव करू शकले. काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आपलं नशीब आजमावणार्‍या राहुल जगताप यांना 99281 मतं मिळाली. तर बबनराव पाचपुते यांना 85644 मत मिळाली. तब्बल 13 हजार मतांनी नवख्या जगताप यांनी पाचपुतेंना पराभूत केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close