अपक्षांचा भाव वधारला, भाजप-सेनेकडून पायघड्या ?

October 20, 2014 8:44 PM0 commentsViews:

ravi rana20 ऑक्टोबर : निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सत्ता कोण स्थापणार यावरून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. पण अपक्षांचा भाव ही वधारलाय. अपक्ष आमदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं पायघड्या घातल्या आहेत. शिवसेना आणि भाजपकडून अपक्ष आमदारांना फोन लावले जात आहे. बडनेराचे आमदार रवि राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निमंत्रण दिल्याचं सांगितलंय.

विदर्भात एकमात्र ठिकाणी म्हणजेच अमरावतीमध्ये 2 अपक्ष आमदार निवडून आले आहे. बडनेरा विधानसभा मतदार संघातून अपक्ष आणि राष्ट्रवादी समर्थित रवी राणा तर अचलपूर विधानसभा मतदार संघातून बच्चू कडू यांनी हॅट्रिक मारली आहे. त्यामुळे आता भाजप, सेना, राष्ट्रवादीकडून संपर्क केला जात असल्याचं या आमदारांनी सांगितलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही फोन आल्याचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी सांगितलंय. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केल्याचं बच्चू कडू यांनीही म्हटलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close